Skip to content Skip to footer

काँग्रेसला अजून एक झटका, राजू शेट्टी विधानसभेला राबविणार “मिशन ४८”

लोकसभा निवडणुकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांचा शिवसेना नवनिर्वाचित खासदार माने यांच्याकडून एक लाख मतांनी पराभव झाला होता. हा झालेला पराभव शेट्टी यांच्या जास्तच जिव्हाळी लागलेला दिसून येत आहे. म्हणूंनच त्यांनी येणाऱ्या आगामी विधानसभेला “एकला चलो रे” ची भूमिका घेतलेली आहे.

परंतु शेट्टी यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या अडचणीत अधिकच वाढ झालेली दिसून येत आहे. दोनच दिवसापूर्वी गवई गटाने सुद्धा १० जागेची मागणी काँग्रेस पक्षाकडे केली होती. तसेच वंचितने सुद्धा ४० जागा काँग्रेसला सोडण्याचे ठरवून यांचं फॉर्मूल्यावर युती करण्याची ऑफर काँग्रेस पक्षाला दिलेली आहे.

या प्रकरणावर भाष्य करताना शेट्टी महाले की, ‘आघाडीबाबत अद्याप निर्णय झाला नसून पुढील महिन्यात होणाऱ्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत आघाडीत जायचं की नाही, याबाबतचा निर्णय घेऊ, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.

राजू शेट्टींच्या या नव्या भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गोटात चिंता निर्माण झालेली दिसून येत आहे. कारण आधीच लोकसभा निवडणुकीत राज्यात आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. त्यात विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टींनी साथ सोडल्यास तो काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असेल.

Leave a comment

0.0/5