Skip to content Skip to footer

नितेश राणेंवर खुनाचा प्रयत्नांचा कलम लावण्याचे मी आदेश दिले आहे-चंद्रकांत पाटील

आमदार निलेश राणे यांनी अभियंत्याला केलेली मारहाण आणि केलेली शिवीगाळ ही त्याच्या अंगलट येणार आहे. तसेच हे प्रकरण अधिकच चिघळण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. दोनच दिवसापूर्वी महसूल मंत्री पाटील यांनी पुणे येथे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि राणे यांच्यावर कडक कारवाही करण्याचे आश्वासन सुद्धा दिलेले आहे. त्यातच अभियंत्याच्या घरी दिलेल्या भेटीचा व्हिडिओ समोर आलेला आहे.

‘अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर खुनाचा प्रयत्न केलाचा कलम लावण्याचे आदेश मी दिले आहेत,’ असे अभियंत्याच्या कुटुंबाला चंद्रकांत पाटील हे सांगत असल्याचं या ध्वनीचित्रफितीमध्ये ऐकायला मिळत आहे. चंद्रकांत पाटलांच्या या व्हिडिओमुळे आता हे प्रकरण आणखीनच चिघळणार असल्याचं दिसत आहे.

मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांविरोधात कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मिळून हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले. इतकेच नाही तर शेडेकर यांना शिवीगाळ करत खांबाला बांधून ठेवण्याचा प्रयत्नदेखील केला.

या प्रकारामुळे नितेश राणेंवर चौफेर टीका केली जात आहे. नितेश यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीदेखील घडल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. याबाबत नारायण राणे यांनी स्वतः माफीदेखील मागितली.

Leave a comment

0.0/5