असा खासदार होणे नाही…..

खासदार | There is no such MP

हातकणंगलेमधील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी स्वत: साहित्याची पोती ट्रकमधून खाली उतरवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूरातील शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी नवी़न कपडे, तांदूळ-डाळ, खाद्यपदार्थ आणि जिवनावश्यक वस्तू पाठवल्या आहेत. त्यानंतर धैर्यशील माने यांनी सर्वांसोबत प्रत्येक ट्रकमधील ते साहित्य खाली उतरवून घेतले.

धैर्यशील माने गेल्या ५-६ दिवसांपासून पूरग्रस्त भागात जाऊन मदत करत आहे. लोकांना हव ते पूरवत आहेत, अशा शब्दात धैर्यशील मानेचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. दरम्यान, कोल्हापूर-सांगलीतील महापूराचे पाणी ओसरत असले तरी त्यानंतर उद्भवणाऱ्या समस्यांचा डोंगर कायम आहे.

228 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here