Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीच्या रथावर स्वार झालेले अमोल कोल्हे हे शिवसेनेचे पार्सल – सामना

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना पक्षाला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला तसेच प्रवेश करताच शिरूर मतदार संघातून खासदार म्हणून निवडून सुद्धा आले. आज राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातून होत असलेल्या नेत्यांच्या गळतीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा शिवसेनेच्या “सामना” या मुखपत्रातून पवारांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेण्यात आलेला आहे.

पवारसाहेब, तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. राष्ट्रवादीच्या रथावर सध्या स्वार झालेले डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेचेच पार्सल आहे व ते तुमच्या रथावर चढल्याने स्वाभिमानाचे वजन वाढून रथाचा टायर पंक्चर झाल्याची बातमी नाही,” अशी कोपरखळी शिवसेनेनं लगावली आहे.

शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्या नेत्यांविषयी पवारांनी वापरलेल्या स्वाभिमान या शब्दावर बोट ठेवले आहे. “खरे तर ‘स्वाभिमान’ हा शब्द सध्या कोणत्याही राजकारण्याने वापरू नये. राष्ट्रवादीच्या रथावर सध्या स्वार झालेले डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेचेच पार्सल आहे व ते तुमच्या रथावर चढल्याने स्वाभिमानाचे वजन वाढून रथाचा टायर पंक्चर झाल्याची बातमी नाही,” असा चिमटा काढत “उदयनराजे भोसले यांनी पक्षांतर करताच म्हणजे ते भाजपात जाताच त्यांची सर्व कामे मुख्यमंत्र्यांनी त्याच दिवशी केली.

पण, नवी मुंबईचे गणेश नाईक ठाण्यातील भाजप कार्यक्रमात गेले. तेथे त्यांना बसायला कुणी खुर्ची दिली नाही असे प्रसिद्ध झाले. येथे पुन्हा स्वाभिमानाचा प्रश्न येतोच. माणसे आणि वकुब पाहून विकासकामे व स्वाभिमानाचे तुरे मिरवले जातात. पवारसाहेब, तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबूच भुईसपाट झाला. स्वाभिमानाचे नाव का घेता,” असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

Leave a comment

0.0/5