Skip to content Skip to footer

वंचितचे गोपीचंद पडळकर लवकरच करणार घरवापसी ?

राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला भाजपा पक्षाकडून हादरे मिळत असताना आता लवकरच वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर लवकरच भाजपा पक्षात प्रवेश करत वंचितला धक्का देण्याच्या तयारीत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर भाजपामध्ये घरवापसी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सांगलीतील जत किंवा खानापूर विधानसभा मतदारसंघातून पडळकर भाजपाच्या तिकटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपाच्या गोटात गेले. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीच्या कंपूतही चिंतेचं वातावरण दिसत आहे. गोपीचंद पडळकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. भाजप आणि शिवसेना युतीच्या निर्णयानंतर पडळकर यांच्या भाजपप्रवेशाबाबत निर्णय होणार असल्याची माहिती आहे. पडळकर लोकसभा निवडणुकीतही सांगली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी खानापूर आणि जत मतदारसंघात पडळकर यांना जास्त मतदान झाले होते.

Leave a comment

0.0/5