Skip to content Skip to footer

बीड सोडून स्वतःच्या जिल्ह्यात लक्ष घाला, एखादी जागा वाढेल

बीड सोडून स्वतःच्या जिल्ह्यात लक्ष घाला, एखादी जागा वाढेल – पंकजा मुंडे
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी वाढलेली दिसून येत आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच व्यस्त आहे. त्यातच आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालवे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंडे आणि पवार यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यावेळी त्या म्हणाल्या, बारामतीत लक्ष न घालता शरद पवार हे बीडमध्ये शून्य जागा आहेत तिथं लक्ष घालत आहेत. शरद पवारांनी स्वत:च्या जिल्ह्यात लक्ष घालावे. म्हणजे एखादी जागा तरी वाढेल. बीड जिल्ह्यात ते शक्य नाही, असे भाजपाच्या नेत्या व परळी मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लक्ष केले.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, पश्चिम महाराष्ट्रासारखा बीड जिल्हा आता स्वत:चे नेतृत्व सांभाळायला सक्षम आहे. शरद पवारांनी बीड जिल्ह्याला राजकारणाशिवाय काहीच दिलं नाही. विकासाची कवडी पण दिली नाही. आम्ही शाश्वत विकास दिला. तुम्ही काय दिले, एखादा बंधारा तरी दिला का?’ असे म्हणत मुंडे यांनी पवारांना सवाल केला.

हे ही वाचा:-

शरद पवारांनी येरवडा तुरुंगात गांधींच्या शेजारची खोली घेऊन रहावे

Leave a comment

0.0/5