Skip to content Skip to footer

प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात हजर, इक्बाल मिरचीशी आर्थिक व्यवहार प्रकरणी चौकशी

प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात हजर, इक्बाल मिरचीशी आर्थिक व्यवहार प्रकरणी चौकशी
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कासकर याचा जवळचा सहकारी दिगवंत इक्बाल मेमन उर्फे इक्बाल मिरची यांच्याशी असलेल्या कथित आर्थिक भागीदारी संदर्भात राष्ट्रवादीचे नेते तथा माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांची सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडीने चौकशी सुरु केलेली आहे या चौकशीसाठी पटेल ईडीच्या कार्यालयात हजर झाले.

वरळीतील नेहरू प्लेटोरियम जवळ असलेल्या मोक्याच्या जागेवर असलेला भूखंड जो इक्बालच्या मालकीचा होता ते भूखंड पटेल यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या असलेल्या मिलेनियम डेव्हलपर प्रा.लि च्या नावे हस्तांतरित करण्यात आला. या प्रकरणात दोन्ही कुटुंबाकडून रीतसर करार करण्यात आला. त्यानंतर या जागेवर सीजय हाऊस या नावाने १५ मजली व्यापारी तसेच निवासी इमारत उभारण्यात आली. असा आरोप ईडी कडून करण्यात आला.

या करार पत्रावर ईडीने आपले लक्ष केंद्रित केले आहे. ईडीने या प्रकरणात ब्रिटिश नागरिक असलेल्या हारून युसूफ आणि जगजितसिंग बिंद्रा यांना अटक केली आहे. मुंबई मधील मोक्याच्या जमिनी इक्बाल मिरचीला मिळवून देण्यासाठी हे दोघे महत्वपूर्ण भूमिका निभावत होते.

हे ही वाचा-:

देवरा आणि निरुपम काँग्रेसचे खरे नेते नाहीत – शरद पवार

Leave a comment

0.0/5