Skip to content Skip to footer

प्रिया बेर्डे पाठोपाठ अभिनेत्री सविता मालपेकर करणार राष्ट्र्वादीत प्रवेश ?

प्रिया बेर्डे पाठोपाठ अभिनेत्री सविता मालपेकर करणार राष्ट्र्वादीत प्रवेश ?

काही दिवसापूर्वी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. आता त्यांच्या पाठोपाठ मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर ह्या सुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. लवकरच सविता मालपेकर राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्या प्रवेश करणार आहे. त्यांच्या सोबत गीतकार आणि अभिनेते असेलेले बाबा सौदागर, अभिनेत्री अर्चना नेवरेकर हेदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. सविता मालपेकर या मराठीतल्या अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक सिनेमा आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. मूळशी पॅटर्न, काकस्पर्श या सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. मराठी नाटक, सिनेमा, मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे.

Leave a comment

0.0/5