“भीती गुलामांना असते”, खडसेंच्या फडणवीसांना टोला !!
आज खडसे यांच्या जळगावातल्या मुक्ताईनगरमध्ये “जनसेवेचा मानबिंदू एकनाथ खडसे” या पुस्तकाचे प्रकाशन एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमावेळी खडसेंनी आपले मनोगत मांडले. यावेळी त्यांनी विरोधीपक्ष नेते फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.
यावेळी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात खडसेंनी सतत फडणवीसांवर करण्यात येणाऱ्या टीकेचे समर्थन केलं असून, पडण्याची भीती गुलामांना असते असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचा त्रास झाला म्हणून मी त्यांचं नाव घेतो. पुढे बोलताना त्यांनी फडणवीसांमुळे राज्यात सरकार आले नाही, असे सुद्धा खडसेंनी यावेळी बोलून दाखविले होते.