Skip to content Skip to footer

एकनाथ खडसे हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने रवाना, उद्या होणार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश

एकनाथ खडसे हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने रवाना, उद्या होणार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश

भाजपचे माजी जेष्ठ नेते, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर खडसे यांनी मुक्ताईनगर येथे पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना, आपण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याची टीका केली होती. तसेच शुक्रवारी ते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहे.

यावेळी एकनाथ खडसे आपल्या परिवारासह मुंबईच्या दिशेने हेलिकॉप्टरने रवाना झाले आहे. त्यावेळी त्यांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी खडसे यांच्या नावाने घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
खडसे यांच्या प्रवेशावर बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्या येण्याने राष्ट्रवादी पक्षाचे निश्चित बळ वाढणार आहे. भाजपामध्ये होणारा अन्याय लोकांनी पाहिला आहे. हळूहळू आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होईल. खडसेंबरोबर येण्याची अनेकांची इच्छा आहे. आम्ही त्यांना टप्पाटप्प्याने प्रवेश देणार आहोत, असे देखील जयंत पाटील यांनी बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5