Skip to content Skip to footer

फडणवीसांनी खडसे यांचा राजकीय बळी घेतला, ते जूने ट्विट होत आहे वायरल…

फडणवीसांनी खडसे यांचा राजकीय बळी घेतला, ते जूने ट्विट होत आहे वायरल…

भाजपचे माजी जेष्ठ नेते, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर खडसे यांनी मुक्ताईनगर येथे पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना, आपण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याची टीका केली होती. तसेच शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे राष्ट्र्वादीत प्रवेश करणार आहे. त्यातच आता भाजपा नेते, खासदार नारायण राणे यांचे जुने ट्विट वायरल होताना दिसत आहे.

फडणवीसांनी-खडसे-यांचा-रा-Fadnavis-Khadse-ya-ra

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचा राजकीय बळी घेतला असून, भाजपमध्ये बहुजन नेतृत्वाला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका बाजूला एकनाथ खडसेंना क्लीनचीट दिल्याचे मुख्यमंत्री सांगतात, दुसऱ्या बाजूला दिल्लीत जाऊन खडसेंचा राजीनामा घ्यायची विनंती करतात. या सरकारमध्ये बहुजन समाजाच्या नेत्यांना आतापर्यंत टार्गेट करण्यात आले आहे असे दिसून येते, असे ते ट्वीट आहे. ४ जून २०१६ साली हे ट्विट करण्यात आले आहे. मात्र आता खडसे यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर ते ट्विट वायरल होत आहे.

Leave a comment

0.0/5