Skip to content Skip to footer

कोणी किती भूखंड घेतले ते काही दिवसात सांगेन! – खडसे

कोणी किती भूखंड घेतले ते काही दिवसात सांगेन! – खडसे

भारतीय जनता पक्षाचे माजी वरिष्ठ नेते, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी सुद्धा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर खडसे यांनी मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

‘माझ्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप लागवण्यात आला होता. अँटी करप्शन विभागाची चौकशी विनाकारण मागे लावण्यात आली होती. माझा एकप्रकारे छळ करण्यात आला. आता थोडे दिवस जाऊ द्या. खरं काय आहे ते मी तुम्हाला सांगेन. कोणी किती भूखंड घेतले मी तुम्हाला दाखऊन देईन!’ असा इशाराच खडसेंनी दिला आहे.

पुढे बोलताना खडसे म्हणाले की, ‘नियमाच्या बाहेर जाऊन जर कुणी काही केले असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे माझे मत असून तशी मागणी मी आता सरकारकडे करणार आहे’, असे बोलून दाखवत आधीच्या सरकारच्या काळातील भूखंड घोटाळे बाहेर काढण्याचे स्पष्ट संकेतच एकनाथ खडसे यांनी यावेळी दिले आहेत.

Leave a comment

0.0/5