आमदार योगेश कदमांच्या प्रयत्नांमुळे रत्नागिरी जिल्ह्याला मिळाली पहिली सि.टी. स्कॅन यंत्रणा
कोकणातील प्रमुख जिल्हा म्हणून ओळखला जाणारा रत्नागिरी जिल्हा अनेक आरोग्य सुविधांच्या अभावामुळे वैद्यकीय दृष्ट्या मागास राहिला आहे. येथे मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या ग्रामीण जनतेला आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी, उपचारांसाठी तसेच तपासण्या करण्यासाठी मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये जावे लागत आहे. सि.टी. स्कॅन यंत्रणा येथे नसल्याने रुग्णांना आजराबद्दलाची ठोस माहिती मिळत नसे. तसेच त्यांना प्रवास आणि महागड्या खर्चांमुळे होणार नाहक त्रास लक्षात येताच दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्यात सी.टी. स्कॅन यंत्रणेसाठी मागणी केली.
काही काळातच मुख्यमंत्री व राज्याच्या आरोग्य विभागाकडून योगेश कदम यांच्या मागणीला हिरवा कंदील देण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघातील खेड तालुक्यात ही सि.टी. स्कॅन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. प्रदीर्घ मागणीनंतर या सुविधेसाठी मार्ग मोकळा झाला असून, जिल्ह्यातील वैद्यकीय विभाग व नागरिक आमदार योगेश कदम यांचे आभार व्यक्त करत आहेत.