Skip to content Skip to footer

सोमय्या यांच्या आरोपांना खुद्द अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी दिले सडेतोड उत्तर

सोमय्या यांच्या आरोपांना खुद्द अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी दिले सडेतोड उत्तर

भाजपा नेते किरीट सोमय्या आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांमध्ये २१ जमिनीचे व्यवहार झाल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लगावला होता. उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. दरम्यान किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनी अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

मला बऱ्याच लोकांकडून कळलं असून व्हिडीओ देखील पाहिला आहे. पण याच्यात गुपीत असं काहीच नाही. त्यांनी आमच्याकडून जागा विकत घेतली आणि आम्ही ती दिली. किरीट सोमय्या जे सातबारे दाखवत आहेत ती खुली कागदपत्रं असतात. महाभूमीच्या वेबसाईटवर गेलात तरी तुम्हाला ती मिळतील. त्यामुळे ही अशी खुली कागदपत्रं जाहीर केल्याबद्दल मी किरीट सोमय्यांचे आभार मानते, असा टोला अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी लगावला होता.

“जमीन कोणी विकत का देऊ शकत नाही? हा योग्य मार्गाने झालेला व्यवहार आहे. यामध्ये किरीट सोमय्यांना आता का समस्या जाणवत आहे. त्याचा आत्महत्येच्या प्रकरणाशी काय संबंध आहे. किरीट सोमय्या नेमकं काय दाखवू इच्छित आहेत?”, अशी विचारणा आज्ञा नाईक यांनी केली आहे. “किरीट सोमय्या यांना काही मदत हवी असेल तर मी स्वत: हजर होईल, तुम्ही कधीही बोलवा,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्या यांना राजकारण करायचं असेल तर ते काहीही मुद्दे आणू शकतात. पण हे आत्ता आणण्यामागचं काय प्रयोजन आहे हे मलाच विचारायचं आहे? गुन्हेगार अर्णब गोस्वामीला पाठीशी का घालताय?, अशी विचारणा आज्ञा नाईक यांनी केली आहे. तर दुसरीकडे अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी ५ मे २०१८ ला जेव्हा आम्ही अग्नी दिला तेव्हा किरीट सोमय्या कुठे गेले होते? त्यांची बोबडी वळली होती का? अशी विचारणा केली.

Leave a comment

0.0/5