Skip to content Skip to footer

नारायण राणे म्हणजे नेमकं रसायन काय हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो – विनायक राऊत

नारायण राणे म्हणजे नेमकं रसायन काय हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो – विनायक राऊत

राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाने ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत आहे. त्यात माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. त्यात आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

“महाराष्ट्राचा रथ विकासाकडे घेऊन जाणारा ड्रायव्हर मुख्यमंत्री आम्हाला चालेल. मात्र नारायण राणे सारखा डराव डराव करणारा बेडूक आम्हाला नको”, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. राऊत यांनी रविवारी मराठी मद्यमावर प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

“नारायण राणे म्हणजे नेमकं रसायन काय हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे राणेंच्या बकवासगिरीला उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही” अशा शब्दांत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर टीका केली आहे. तसेच मराठा आरक्षणसंदर्भात बोलताना राऊत म्हणाले की, “मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. सरकार ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार. मात्र भाजपने सत्तेत असताना नेमके काय दिवे लावले?”, असा सवाल शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

Leave a comment

0.0/5