Skip to content Skip to footer

अमर, अकबर आणि अँथनीने ‘रॉबर्ट सेठचा’ पराभव केला – काँग्रेस

अमर, अकबर आणि अँथनीने ‘रॉबर्ट सेठचा’ पराभव केला – काँग्रेस

महाराष्ट्रात शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीने भरतीय जनता पक्षाला पराभवाची धूळ चाखत घवघवीत यश मिळविले आहे. तर भाजपाने सपाटून मार खाल्ला आहे. भाजपच्या या पराभवावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला जोरदार टोला लगावला आहे. अमर, अकबर आणि अँथनीने ‘रॉबर्ट सेठचा’ पराभव केला. असा टोला सावंत यांनी लगावला होता.

सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या ते म्हणतात की, भारतीय जनता पक्ष नेहमी आघाडी सरकारला अमर, अकबर आणि अँथनीच सरकार असे म्हणत होत. अमर, अकबर आणि अँथनी जसा हिट चित्रपट होता. तसेच महाविकास आघाडीचे कॉम्बिनेशन आत हिट झाले आहे. आणि अमर, अकबर आणि अँथनीने ‘रॉबर्ट सेठचा’ पराभव केला असे ट्विट त्यांनी केलं आहे.

Leave a comment

0.0/5