Skip to content Skip to footer

चंद्रकांत पाटलांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, भाजपा पदाधिकाऱ्याची मागणी

चंद्रकांत पाटलांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, भाजपा पदाधिकाऱ्याची मागणी

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या निकालात आघाडी सरकारने भारतीय जनता पक्षाला पराभवाची धूळ चाखत दणदणीत विजय मिळवला होता. याच पार्श्वभूमीवर आता प्रदेशाध्यक्ष
आणि कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे मूळ गाव असलेल्या कोल्हापूर जिल्हयातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी.डी.पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यासोबत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वतःहून स्वीकारून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

या मागणीमुळे आता चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यातच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान पुणे आणि औरंगाबाद हे दोन मतदारसंघ भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जातात मात्र या मतदार संघात सुद्धा भाजपाला पराभवाची चव चाखावी लागली हीच बाब भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्या जिव्हाळी लागली आहे. त्याचमुळे कुठेतरी आता चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी होताना दिसत आहे.

Leave a comment

0.0/5