Skip to content Skip to footer

मुख्यमंत्र्यांनी पालिका पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना दिला हा कानमंत्र

मुख्यमंत्र्यांनी पालिका पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना दिला हा कानमंत्र

महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षात बदल होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. त्यात शिवसेना पक्ष प्रमुख आणिमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक मधील कोअर कमेटीच्या बैठकीत महानगर पालिका निवडणुकीच्या विजयासाठी कानमंत्र दिला आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना गेल्या वेळेच्या चुका टाळून, एकदिलाने व एकजुटीने पक्षाची पुर्नबांधनी करून पालिकेवर भगवा फडकवण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांन दिला आहे. शासनाच्या योजना तसेच चांगली कामे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचा कानमंत्रही त्यांनी यावेळी दिला.

शिवसेनाच्या शाखांचा विस्तार करून त्या भक्कम करा, तसेच बूथ बांधणीचे नियोजन आतापासूनच सुरू करण्याच्या सूचना ठाकरेंनी यावेळी पदाधिकाऱ्यांना केल्या. गेल्या वर्षभरात शासनाने नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सदरचे निर्णय नागरिकांपर्यंत पोहचवा. तसेच त्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचा सल्ला यावेळी ठाकरेंनी दिला. तर ‘मनपावर आम्ही भगवा फडकवू,’ असे आश्वासन यावेळी बडगुजर यांनी ठाकरेंना दिले.

Leave a comment

0.0/5