मुख्यमंत्र्यांच्या वाटेत नेमके अडथळे कोणते आहेत व ते कोण आणत आहे? जयंत पाटील म्हणतात की
राज्यात स्थापन झालेले तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थपणे सांभाळत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे तोंड भरून स्तुती केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना, सध्या मी कार आणि सरकार दोन्ही व्यवस्थितपणे चालवत आहे. मध्ये काही खड्डे आणि अडचणी येत असल्या तरी त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. माझ्या हाती स्टेअरिंग भक्कम आहे असे विधान करत भाजपाला टोला लगावला होता.
या टोल्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे अत्यंत चांगल्या प्रकारे कार चालवतात हे खरं आहे पण, ते कार चालवतात तेव्हा त्यांच्यासाठी ट्रॅफिक पूर्णपणे थांबतं असा टोला लगावला होता. या टोल्याला मंत्री जयंत पाटील यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
राज्याचं स्टेअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाती आहे आणि त्यांची गाडी व्यवस्थित सुरू आहे, असे जयंत पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या वाटेत नेमके अडथळे कोणते आहेत व ते कोण आणत आहे?, असे विचारले असता अडथळे आहेत हे आम्हालाही दिसतं आहे पण, त्याने त्यांना काही फरक पडलेला नाही, असे हसतच पाटील म्हणाले.