Skip to content Skip to footer

भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांच्या संदर्भात अपमानकारक शब्द, गृहमंत्र्याचा भाजपाला इशारा

भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांच्या संदर्भात अपमानकारक शब्द, गृहमंत्र्याचा भाजपाला इशारा

भाजपाच्या अधिकृत वेबसाइडवर भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे संतापजनक आणि अपमानकारक शब्दात वर्णन करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणाची आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेत सदर व्यक्तीवर कारवाई करावी असा इशारा भाजपाला दिला आहे.

या संदर्भात बोलताना देशमुख म्हणाले की, भाजपाने याप्रकरणातील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल, असा इशाराच अनिल देशमुखांनी दिला आहे. आता भाजप काय भूमिका घेते,याकडे लक्ष लागले आहे.

भाजप खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत अपमानकारक शब्दात वर्णन करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर दिली आहे. पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर याबाबतचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. स्वाती चतुर्वेदींचे ट्विट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रिट्विट करत भाजपकडे दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल कारवाई करेल, असा इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे.

Leave a comment

0.0/5