Skip to content Skip to footer

अहमदनगर शहरातील रस्त्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !!

अहमदनगर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी ५ कोटींच्या निधीला आज मंजुरी दिली. खड्डेमुक्त अहमदनगरच्या उद्देशपूर्तीसाठी दिलेल्या या निधीबद्दल खासदार डॉ. श्री. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे समस्त नगरकरांच्या वतीने आभार मानले आहेत.

६ डिसेंबर २०२२ रोजी खासदार डॉ.विखे यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सदर निधीची मागणी केली होती.

त्या पार्श्वभूमीवर आज हा निधी मंजूर करण्यात आला. अहमदनगर शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती डॉ. विखे यांनी यावेळी दिली.

हा निधी मंजूर करून अहमदनगर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल सुरू केल्याबद्दल अहमदनगरवासियांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व पाठपुरावा केल्याबद्दल खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.

Leave a comment

0.0/5