Skip to content Skip to footer

युवासेना सहसचिव मयुर कांबळे यांच्यामार्फत शेकडो चित्रे रेखाटून बालकांची बाळासाहेबांना आदरांजली

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वडाळा विभागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. शिवसेना व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने युवासेना सहसचिव मयुर कांबळे यांच्यामार्फत वडाळा विधानसभा शाखा क्रमांक 201 (208) मधील शालेय विद्यार्थांकरीता या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शेकडो विद्यार्थी सहभागी होत त्यांनी रंग रेषांद्वारे शेकडो चित्रे रेखाटून बाळासाहेबांना अनोखी आदरांजली अर्पण केली.

स्पर्धेतील मुला मुलींना ड्राॅइंग पेपर विविध प्रकारचे रंग पेन्सिल देण्यात आले होते. यानंतर या चिमुकल्यांनी ड्राॅइंग पेपरवर अत्यंत आकर्षक अशी निसर्ग चित्रे व्यक्तिचित्रे रेखाटली. यात काही मुलांनी बाळासाहेब ठाकरे हे माईक समोर उभे राहून भाषण करतायेत हे रूप दाखवले. काही मुलांनी रस्त्यावर बसलेले फेरीवाले, टॅक्सीवाला, रिक्षावाला, नळावरील पाणी वाहून नेणारी महिला, उद्यानातील झाडेझुडपे, फुलझाडे, धावणाऱ्या बेस्ट बसेस, लोकल याचीही चित्रे मुलांनी रेखाटून आपल्यातील उत्तम कलेचा आविष्कार घडविला. स्पर्धेतील विजेते विद्यार्थी व विद्यार्थिनींना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी वडाळा विधानसभा संघटक राकेश देशमुख, शाखाप्रमुख हमीद शेख, शाखासंघटिका सरीता मांजरे, शाखा समन्वयक विशाल जाधव, युवाशाखा अधिकारी स्वप्निल केळशीकर, चिनुभाई, मोहम्मद हुसैन, शफी शेख, स्मिता वाडेकर, श्रध्दा तांबे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Felicitation of children for participating in drawing competition Drawing competition for children Felicitation of children for participating in drawing competition Felicitation of children for participating in drawing competition

Leave a comment

0.0/5