मुंबई : रिलायन्स जिओच्या नवनव्या ऑफरनंतर इतर दूरसंचार कंपन्यांनी देखील नव्या ऑफर आणल्या. त्यानंतर आता BSNL नं देखील आपल्या यूजर्ससाठी नवा प्लॅन आणला आहे.
जिओच्या 309 आणि 399 रुपयांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी BSNLनं 298 रुपयांचा नवा प्लॅन आणला आहे.
298 रुपयांच्या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सला अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग आणि 56 दिवसांसाठी डेटा मिळणार आहे.
या प्लॅनमध्ये 1 जीबी FUP लिमिटसह डेटा मिळणार आहे.
1 जीबी डेटा संपल्यानंतरही यूजर्स इंटरनेट अॅक्सेस करु शकतात. पण त्याचा स्पीड कमी होईल. या प्लॅनची वैधता 56 दिवसांसाठी असणार आहे.
https://maharashtrabulletin.com/android-8-oreo-latest-update-download/
हा एक प्रमोशनल प्लॅन आहे. ज्यामध्ये 180 दिवसांसाठी म्हणजेच 7 ऑगस्ट ते 4 नोव्हेंबरदरम्यान हा प्लॅन घेता येणार आहे.
जिओनं 309 रुपयांचा प्लॅन रिवाइज केला असून यामध्ये 56 दिवसांसाठी अनिलिमिटेड कॉलिंग आणि 56 जीबी डेटा देण्यात आला आहे.
https://maharashtrabulletin.com/vodafone-unlimited-plans/