Skip to content Skip to footer

आशियाई स्पर्धेवरील पाक हॉकी पटूंचा बहिष्कार मागे 

कराची : याच महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पाकिस्तान हॉकी खेळाडूंचा बहिष्कार टाळण्यात पाक हॉकी महासंघास यश आले आहे. खेळाडूंचे थकीत मानधन स्पर्धेपूर्वी देण्याचा निर्णय घेत त्यांनी खेळाडूंना बहिष्काराच्या निर्णयापासून दूर ठेवले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत पाकिस्तान हॉकी संघ सर्वाधिक यशस्वी असून, त्यांनी आठ सुवर्णपदके मिळविली आहेत. हॉकी महासंघाने सहा महिन्यांपासून मानधन थकवल्यामुळे त्यांनी थेट स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचे शस्त्र उगारले होते.

पाकिस्तान खेळाडूंच्या या आक्रक पवित्र्यामुळे हॉकी महासंघास त्यांच्या मागणीचा विचार करताना एक पाऊल मागे यावे लागले. महासंघाचे अध्यक्ष खलिद सैजाद खोकर यांनी थकित मानधन 18 ऑगस्टपूर्वी देण्याचे अश्‍वासन दिल्यामुळे खेळाडूंनी बहिष्काराचा निर्णय मागे घेतल्याचे कर्णधार रिझवान याने सांगितले.

खोकर म्हणाले, “आम्ही खेळाडूंचे मानधन जाणूनबुजून रोखलेले नव्हते. कुठलेही कारण न देता आम्हाला मिळणारे अनुदान रोखण्यात आले होते. त्यावर अजून निर्णय झालेला नाही. आम्हाला अनुदान मिळाले नाही, तरी पाकिस्तान हॉकीची प्रतिष्ठा लक्षात घेता आपण स्वतःच्या खिशातून खेळाडूंचे मानधन देणार आहोत.”

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5