Skip to content Skip to footer

विराट कोहलीने रोहित शर्माच्या एक नाही तर दोन विश्वविक्रमांना दिला धक्का.

बुधवारी(18 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने सहज विजय मिळत 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात 52 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या. विराटचे हे आंतरराष्ट्रीय टी20 मधील 22 वे अर्धशतक आहे. या अर्धशतकाबरोबरत त्याने दोन विश्वविक्रमही केले आहेत.

विराट आता संघसहकारी रोहित शर्माला मागे टाकत आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 71 सामन्यात 50.85च्या सरासरीने 2441 धावा केल्या आहेत.याआधी हा विक्रम रोहितच्या नावावर होता. पण रोहित या सामन्यात 12 धावांवरच बाद झाल्याने त्याच्या आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 97 सामन्यात 32.45 च्या सरासरीने 2434 धावा झाल्या आहेत. तो आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करण्याऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत विराटच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

विराटने बुधवारी आंतरराष्ट्रीय टी20मधील कारकिर्दीतील 22वी अर्धशतकी खेळी केल्याने तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिकवेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची ही 22 वी वेळ होती.

याआधी हा विश्वविक्रम विराट आणि रोहित यांच्या नावावर संयुक्तरित्या होता. पण आता विराटने रोहितला मागे टाकले आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 21 वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 4 शतकांचा आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे.

#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

2441 धावा – विराट कोहली (71 सामने)
2434 धावा – रोहित शर्मा (97 सामने)
2283 धावा – मार्टिन गप्टिल (78 सामने)

Leave a comment

0.0/5