Skip to content Skip to footer

सारानं दिलं अर्जुन तेंडुलकरवर टीका करणाऱ्या नेटकऱ्यांना उत्तर

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची आयपीएल २०२१ खेडाळु लिलावात सर्वात जास्त बोली लागली होती. तसेच त्याला मुंबई इंडियन्स या संघाने विकत घेतले होते. मात्र अर्जुनला क्रिकेट विश्वात मिळत असलेली संधी त्याच्या वडिलांच्या नावावर मिळाली आहे अशी टीका केली जात होती.

दरम्यान त्याच्यावर होत असलेल्या टीकेला त्याची बहीण सारा सचिन तेंडुलकरने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. साराने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अर्जुनचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोवर तिने एक कॅप्शन लिहीत टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

साराने लिहिले की, “तुला आयपीएल मध्ये जे स्थान आणि जी संधी मिळाली आहे ती केवळ तुझ्या स्वत:च्या मेहनतीच्या बळावर मिळाली आहे. याचे श्रेय कोणीही तुझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. हे तुझ्या मेहनतीचं फळ आहे”, असे म्हणत आपल्या भावाची पाठराखण साराने केली आहे.

Leave a comment

0.0/5