Skip to content Skip to footer

‘या’ भारतीय क्रिकेटपटूने गुपचूप केलं लग्न

वेगवान गोलंदाज जयदेव उनादकट आणि रिनी गुपचूप विवाहबंधनात अडकले आहेत. मंगळवारी रात्री गुजारतमधील आणंद शहरातील मधुबन रिसोर्टमध्ये उनादकट याचं दोनाचं चार हात झाले. उनादकट आणि रिनी या दाम्पत्यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली नाही. मात्र, या गुपचूप उरकण्यात आलेल्या विवाहसोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. उनादकट आणि रिनी यांच्या विवाहाला फक्त मोजकेच लोक उपस्थित होते.

उनादकटची पत्नी रिनी वकील आहे. दोघांनी १५ मार्च २०२० रोजी साखरपुडा केला होता. साखरपुड्याच्या दोन दिवस आधी उनादकटच्या नेतृत्वात सौराष्ट्र संघानं रणजी चषकावर नाव कोरलं होतं. जयदेवनं सोशल मीडियावर रिनीसोबत केलेल्या साखरपुड्याची माहिती दिली होती. मात्र, लग्नाची सर्व माहिती गुपीत ठेवण्यात आली आहे.

लग्नासाठी जयदेव आणि रिनी यांचे कुटुंबीय मागील दोन-तीन दिवसांपासून आणंद शहरात आहेत. सोमवारी संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संगीत समारोहाचं काही व्हिडीओ आणि फोटो त्याच्या मित्रांनं सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर उनादकटच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली.

https://www.instagram.com/p/CKzTRwcsozf/?utm_source=ig_web_copy_link

गेल्या काही दिवसांपासून उनादकट आणि रिनी एकमेंकाच्या प्रेमात होते. २०२१ च्या सुरुवातीलाच दोघांनी लगीनगाठ बांधली. उनाडकटला भारतीय संघाकडून जास्तवेळ खेळयला मिळालं नाही. मात्र, तो आयपीएलमधील एक स्टार खेळाडू आहे. शिवाय त्यानं २०१० मध्ये अंडर -१९ संघाचं नेतृत्वही केलं आहे.

Leave a comment

0.0/5