Skip to content Skip to footer

बीडच्या अविनाश साबळेची ‘सुवर्ण’कमाई

महाराष्ट्र बुलेटिन : पटियाला येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या अविनाश साबळे आणि सर्वेश कुशारे यांनी बुधवारी सुवर्णपदकांची कमाई केली आहे. तसेच कोमल जगदाळेने रौप्यपदक पटकावले आहे. विशेष म्हणजे अविनाश साबळेने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केला आहे.

बीडच्या २६ वर्षीय अविनाश साबळेने ३००० मीटर्स स्टीपलचेस शर्यतीत पाचव्यांदा नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद करून ८ मिनिटं २०.२० सेकंद वेळ नोंदवत स्वतःचाच ८ मि. २१.३७ सेकंदचा विक्रम मोडला आहे. त्याची सुवर्णपदकाची केलेली कमाई निश्चितच अभिमानास्पद आहे. राजस्थानच्या शंकर लाल स्वामीने रौप्य आणि हरियाणाच्या राजकुमारने कांस्यपदक पटकावले आहे.

यापूर्वी देखील अविनाश साबळेने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिक्यपद स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने स्वतःचाच नॅशनल रेकॉर्ड मोडीत काढत जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. जागतिक स्पर्धेत ३००० मी. स्टीपलचेस प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवणारा तो पहिला भारतीय धावपटू ठरला आहे. दरम्यान राज्यभरातून त्याच्यावर शुभेच्छांची उधळण होत आहे.

Leave a comment

0.0/5