Skip to content Skip to footer

कुस्तीचा सामना हरल्यामुळं गीता आणि बबिता यांची बहीण ‘रितिका फोगट’ची आत्महत्या

महाराष्ट्र बुलेटिन : प्रसिद्ध कुस्तीपटू गीता फोगट आणि बबिता फोगट यांची चुलत बहीण रितिका फोगटने आत्महत्या केली असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून कुस्तीक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार बुधवारी भारतपूर येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये १७ वर्षीय रितिका फोगटचा पराभव झाला. हा पराभव तिच्या जिव्हारी लागला आणि ती या अपयशाला पचवू शकली नाही आणि तिने आपले आयुष्य संपवले.

फोगट कुटुंब हे आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटामुळे खूप प्रसिद्धीस आले असून रितिका देखील याच कुटुंबाचा एक भाग होती. राज्यस्तरीय उप-कनिष्ठ, कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धा रितिका खेळत होती. भारतपूर येथे आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनिअर स्पर्धेमध्ये रितिका अंतिम सामन्यात पोहोचली होती. १४ मार्चला झालेल्या त्या सामन्यात रितिकाला एका गुणाने पराभवाला सामोरे जावे लागले. हा पराभव ती पचवू शकली नाही आणि तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

गीता व बबिताचे वडील द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर सिंग फोगट यांच्याकडूनच रितिकाने देखील प्रशिक्षण घेतलं होतं. या स्पर्धेदरम्यान ते देखील उपस्थित होते. रितिका ही महावीर फोगट यांच्याच अकॅडमीमध्ये शिकत होती.

Leave a comment

0.0/5