Skip to content Skip to footer

भंडारा जिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेवर आमदार रोहित पवारांचे भाष्य, सरकार दोषींवर कारवाई करेल

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत बालकांच्या पालकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. या घटनेमुळे संबंध देश हळहळला आहे.

तसेच या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवारांनी ट्विट करून भाष्य केले आहे. “भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागून त्यात १० नवजात बालकांच्या झालेल्या मृत्युच्या घटनेने खूप वेदना झाल्या. ज्या कुटुंबियांवर हे दुःख कोसळलं त्यांच्याप्रति माझ्या सहवेदना आहेत. या घटनेची योग्य चौकशी करुन सरकार दोषींवर कारवाई करेल, असा विश्वास आहे, भावपूर्ण श्रद्धांजली!”

Leave a comment

0.0/5