Skip to content Skip to footer

माजी निवडकर्ता शरणदीप सिंह म्हणाले- ‘टी-२० वर्ल्ड कप’साठी रोहित आणि धवनची ओपनिंग जोडी सर्वोत्तम

महाराष्ट्र बुलेटिन : शिखर धवनला टी-२० मालिका (India vs England) दरम्यान फक्त एका सामन्यात संधी मिळाली. अंतिम सामन्यात स्वत: कर्णधार विराट कोहली सलामीला आला. यानंतर, कोहलीने म्हटले होते की, तो यापुढेही रोहितबरोबर ओपनिंग करू इच्छित आहे. परंतु माजी निवडकर्ता शरणदीप सिंह यांचे म्हणणे आहे की टी-२० वर्ल्ड कप (T20 World Cup) मध्ये टीमने रोहित शर्मा आणि शिखर धवन या अनुभवी सलामी जोडीच्या सोबतच जायला हवे.

शरणदीप म्हणाले, “एका सामन्यानंतर धवनला बाहेर करणे आश्चर्यचकित होते. त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये चांगला खेळ दाखविला. जेव्हा तो खेळतो तेव्हा तो चांगली कामगिरी करतो. तो मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. असे होऊ शकते की कदाचित संघाला काही पर्यायांवर विचार करायचा असेल, परंतु माझा विश्वास आहे की रोहित आणि धवनच्या उजव्या हाताचे आणि डाव्या हाताचे संयोजन वर्ल्ड कपकरिता भारतासाठी सर्वोत्तम पर्याय असेल.”

हार्दिक गोलंदाजी करत नसेल तर क्रुणालला वनडे संघात स्थान नाही

ते म्हणाले की एका सामन्याच्या आधारे तुम्ही आकलन करू शकत नाही. धवनने वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली. संघ तयार करण्यात आयपीएलची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. संघात स्थान मिळवणे सोपे नाही. ईशान किशनलाही चांगला परफॉरमन्स दाखवावा लागेल. शरणदीप यांचे मत आहे की जर हार्दिक पांड्या गोलंदाजी करत नसेल तर क्रुणालला वनडे संघात स्थान नसेल. ते म्हणाले, “जर आपण एकदिवसीय संघाबद्दल बघितले तर हार्दिक गोलंदाजी करत नसेल तर क्रुणाल आपला पाचवा गोलंदाज होऊ शकत नाही. त्याने चांगली फलंदाजी केली, पण क्रुणाल १० षटके गोलंदाजी करू शकत नाही. तो एक चांगला टी-२० खेळाडू आहे, पण जेव्हा एकदिवसीय सामन्यांचा विचार केला जातो तेव्हा फलंदाजांना आव्हान देण्याचे कौशल्य त्याच्यात कमी पडते.”

वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळ्या कर्णधाराची चर्चा कधीच झाली नाही

वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी स्वतंत्र कर्णधार या विषयावर शरणदीप म्हणाले की, त्यांच्या कारकिर्दीत यावर चर्चा देखील झाली नव्हती. ते म्हणाले की जेव्हा तुमचा कर्णधार चांगली कामगिरी करत नाही तेव्हा वेगवेगळ्या कर्णधारांची आवश्यकता असते, परंतु कोहली हा एकमेव असा खेळाडू आहे ज्याची सरासरी सर्व स्वरूपात ५० च्या वर आहे. जर त्याने कोणत्याही एका फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली नाही तेव्हा आपण त्याच्याकडून कर्णधारपदाचा भार कमी करू शकता. टी-२० वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी अजून केवळ ७ महिने शिल्लक आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा भारतात होणार आहे.

Leave a comment

0.0/5