Skip to content Skip to footer

सैफ-करीनाच्या होळी पार्टीसाठी सूटमध्ये बाहेर पडली सारा, त्यानंतर बिकिनीवर स्विमिंग पुलमध्ये केली धमाल

महाराष्ट्र बुलेटिन : काल देशभरात होळी खेळली गेली, बॉलिवूड स्टार्सनीही होळीनिमित्त मस्ती केली. अनेक स्टार्सनी त्यांच्या होळीच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. होळीच्या दिवशी सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांनीही आपल्या घरात पार्टीची व्यवस्था केली होती. ज्यामध्ये सैफ अली खानची मुलगी सारा अली खानही आली होती. दरम्यान तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

https://www.instagram.com/p/CM_-OxXrmj0/

https://www.instagram.com/p/CNAJr0xJUkw/

सारा अली खानच्या होळी सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. यापैकी काही फोटोंमध्ये सारा व्हाईट सूट आणि कलरफुल ओढणीमध्ये दिसत आहे तर काहींमध्ये ती व्हाईट बिकिनीमध्ये स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. खरं तर, जेव्हा सैफ करीनाच्या घराबाहेर सारा स्पॉट झाली होती तेव्हा ती ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसली आणि यानंतर घरात सुरू असलेल्या पूल पार्टीमध्ये ती एका वेगळ्याच लूकमध्ये दिसली.

साराच्या या फोटोवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही यूजर्स साराच्या लूकचे कौतुक करत आहेत तर काही जण तिच्या बिकिनी फोटोंवर तिला ट्रोल करत आहेत. मात्र, तिच्या बोल्ड लूकमुळे सारा ट्रोल होत असल्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही साराला बर्‍याचदा ट्रॉलर्सकडून लक्ष्य केले गेले आहे, परंतु साराला या ट्रॉलर्सचा काहीही फरक पडत नाही. म्हणूनच अ‍ॅक्ट्रेस अनेकदा आपल्या बोल्ड अवतारात सोशल मीडियाचा पारा वाढवत राहतात.

Leave a comment

0.0/5