Skip to content Skip to footer

VIDEO : अफ्रिदी चा अफलातून झेल… नेटकरी हैराण

क्रिकेट विश्वात आपल्या अनोख्या अंदाजामुळे क्रीडारसिकांची दाद मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे शाहिद अफ्रिदी. क्रीडा जगतात आपल्या खेळीने फक्त पाकिस्तानातच नव्हे तर जगभरातील क्रीडारसिकांना वेड लावलं आहे.

अशा या खेळाडूच्या दर्जेदार खेळीचं प्रदर्शन पुन्हा एकदा पाहायला मिळालं. त्याचा तो अंदाज पाहता सोशल मीडियावर अफ्रिदीच्या या अंदाजाने पुन्हा एकदा त्याच्या वयाचा विचार करण्यास अनेकांनाच भाग पाडलं.

मुळात क्रिकेटच्या इतिहासात आजवर बऱ्याच खेळाडूंनी विविध सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यातच अफ्रिदीच्या नावाचाही समावेश झाला आहे.

पाकिस्तान सुपर लीगदरम्यान, क्वेट्टा ग्लॅडिएटर्स आणि कराची किंग्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात अफ्रिदीने एक लक्षवेधी झेल घेतला. या सामन्यादरम्यान, १३व्या षटकाच्या वेळी मोहम्मद इरफानने अमिन या खेळाडूसाठी गोलंदाजी केली.

https://maharashtrabulletin.com/radio-jocky-gave-birth-studio/

इरफानच्या गोलंदाजीवर अमिनने जोरदार फटका लगावत चेंडू मोठ्या ताकदीने सीमारेषेच्या दिशेने भिरकावला.

पण, सीमारेषेजवळच अफ्रिदी क्षेत्ररक्षणासाठी उभा असल्यामुळे त्याने हवेत उडी मारत आपला हात उंचावत अमिनच्या धावांना वेसण घातलं.

Leave a comment

0.0/5