Skip to content Skip to footer

जेव्हा लोक देतात जिवंत माणसालाच श्रद्धांजली..!!

असच काही झालं औरंगाबाद शहरात ..!! औरंगाबाद शहरातील बहुचर्चित सरस्वती भुवन शाळेच्या बाहेर बऱ्याच वर्षांपासून गोळ्या बिस्कीट विकणारे एक कांता नावाचे एक गृहस्थ, प्रत्येक विद्यार्थ्यांचे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते.अचानक एके दिवशी त्यांचे निधन झाल्याचे वृत्त सोशल मीडिया वर वाऱ्या सारखे पसरले.सगळ्यांना आपले “कांता शेठ” आता जगात नाही अशा शब्दात त्यानं श्रद्धांजली दिली .

हि वार्ता त्यांच्या मुलाला सोशल मीडिया वरुण कळली, बातमी ऐकून त्याला धक्काच बसला. त्याने बातमी बघताच माझे वडील कांता शेठ जिवंत व घरी सुखरूप असल्याचे स्पष्ट केले.

https://maharashtrabulletin.com/pune-ring-road-video-1/

एक नादान व सोशल मीडिया वर पोस्ट करण्यासाठी नेहमी उतावळा असलेल्या व्यक्ती ने हा प्रकार केल्याचे लक्षात आले.
मग काय “कांता शेठ ” थेट त्याच्या घरीच गेले. कांता शेठ ला बघून त्याला धक्काच बसला. झालेल्या प्रकार बाबत या उतावळ्याने माफी मागितली आणि कांता शेठ सोबत एक सेल्फी काढून पोस्ट केला.

 

सोशल मीडिया वर कित्येक गोष्टी या अफवा असतात आपणही या नंतर खात्री केल्याशिवाय कोणतीही बातमी फैलवु नये.

श्रद्धांजली-condolence-message-social-media

असा कांता बद्दल चा मेसेज सोशल मीडिया वर वायरल झाला-

भावपुर्ण श्रद्धांजली। मित्रांनो आपल्या बालपणी रोज आपणास कधी खोबरं गोळ्या , कधी लेमन गोळ्या, कधी पेस्ट्री, कधी मूरकुल, कधी पंखा तर कधी ” त्याला माझ्याकडे पाठवा रे, 300 रुपये उधारी झाली राव , आता येतच नाही इकडे, आला की खुर्ची ला बांधून ठेवतो ” असा आवाज देणारे, आणि क्रिकेट match दिवशी कानाला रेडिओ लावून , जडेजा ची आतुरतेने वाट पाहणारे, जडेजाने फोर मारला आन त्यावेळे कोणी गोळ्या घेत असेल तर 4 गोळ्या जास्त देणारे, “तेंडल्या कूच काम का नाही” असे ओरडणारे, असे आपल्या सर्वांचे लाडके कांता मामा यांचे मागील आठवड्यात अनपेक्षित दुःखद निधन झाले. सरस्वती भुवन असो की आ कृ वाघमारे सर्व विद्यार्थ्यांच्या मनात आठवण जागवणारा हा ” आपला माणूस ” होता . त्यांच्या आत्म्यास शांति लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

Leave a comment

0.0/5