Skip to content Skip to footer

जाणून घ्या जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे मन जिंकलेल्या क्रोशिया देशाबद्दल…

know more about Croatiaक्रोशिया हा देश दक्षिण आणि मध्य यूरोप असा तीनही बाजूने वेढलेला आहे. या देशाला लगतच एड्रियाटिक समुद्र किनारपट्टी आहे. इथे क्रोशिअन भाषा बोलली जाते.
क्रोशिया हा देश २५ जून १९९१ साली स्वतंत्र झाला. ज़ाग्रेब ही या देशाची राजधानी आहे. कोलिंदा ग्रॅबर या देशाचे रात्रपती आहेत.
छेत्रफळाच्या दृष्टीने हा देश ५६,८५१ चौरस किलोमीटर एवढा आहे.म्हणजे हा देश हिमाचल प्रदेश एवढा आहे.
सन २०१७ च्या जनगणनेनुसार या देशाची लोकसंख्या ४२,८२,८८९ एवढी आहे. तर लोकसंख्येच्या बाबतीत या देशाचा जगात १२५ वा क्रमांक येतो.
इथे बहुसंख्य ख्रिश्चन धर्मीय लोक राहतात. तसेच १.४% मुस्लिम धर्मीय लोक राहतात.

अर्थव्यवस्था :

१) या देशाचा GDP १०६.५४८ बिलीऑन एवढा आहे.
२) क्रोशिअन कुना असे येथील चलनाचे नाव आहे. १ क्रोशिअन कुना म्हणजे १०.२८ रुपये होय.

नुकत्याच झालेल्या फिफा वर्ल्ड कप मध्ये या देशाच्या टीमला अंतिम फेरीमध्ये फ्रान्स कडून पराभव पत्करावा लागला. तरीही टीम कडून केल्या गेलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे या देशाची जगभर प्रशंशा होत आहे म्हणून जगभरात या देशाबद्दल जाणुन घेण्यासाठी लोकांची उत्सुकता पण वाढली आहे.

Leave a comment

0.0/5