Skip to content Skip to footer

जिल्हा परिषदेच्या निकालानंतर कॉबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

जिल्हा परिषदेच्या निकालानंतर कॉबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या. यामुळे या निवडणूक निकालाची सर्वांना उत्सुकता होती. खास करून नागपूरचा गड राखण्यात भाजपला यश आलेले नाही. खुद्द माजी मुख्यमंत्र्यांना आपला गड राखता आलेला नाही आहे. तर धुळ्यात राष्ट्रवादीला दे धक्का देत भाजपने जोरदार मुसंडी मारली. तर पालघर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

राज्यातील सहा जिल्हा परिषदांमध्ये नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि वाशिम यात केवळ धुळ्यात भाजपला यश मिळाले. बाकी पाच ठिकाणी भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने जिल्हा परिषदांमध्येही भाजपची कोंडी करत धुव्वा उडाला आहे.

याच पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज पुन्हा महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला आणि महाराष्ट्र विकास आघाडीला कल दिला आहे. मी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो आणि सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

Leave a comment

0.0/5