Skip to content Skip to footer

अहमदनगर’चे अंबिकानगर नामकरण करा शिवसेना खासदाराची मागणी

अहमदनगर’चे अंबिकानगर नामकरण करा शिवसेना खासदाराची मागणी

राज्यात औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे अहमदनगरचे अंबिकानगर असे नामकरण करा अशी मागणी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली आहे. शुक्रवारी प्रसार मद्यमांशी बोलताना खासदार सदशिव लोखंडे यांनी प्रतिक्रिया देताना ही मागणी केली आहे. त्यामुळे राज्यात नामकरांच्या मुद्यावरून राजकारण तापत असताना दिसत आहे.

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर व्हावे, ही जनतेची इच्छा आहे. त्यासंबंधी आमचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. मात्र, औरंगाबादपाठोपाठ अहमदनगरचेही नामांतर होऊन या शहराला अंबिकानगर नाव देण्यात यावे अशी आमची मागणी आहे, असे सांगत खासदार सदाशिव लोखंडे यांनी या जुन्या मागणीला हवा भरली आहे.

Leave a comment

0.0/5