Skip to content Skip to footer

मुंबई मनपाच्या प्राणिसंग्रहालयाच्या ‘द मुंबई झू’ या सोशल मीडिया पेजचे लोकार्पण

             बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे ‘द मुंबई झू’ या नावाने सुरू करण्यात आलेले अधिकृत सोशल मीडिया पेज म्हणजे मुंबईसाठी मानाचा आणखी एक तुरा असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
               विविध शैक्षणिक कार्यक्रम तसेच प्राणिसंग्रहालयात होणारे इतर कार्यक्रम प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहचविण्या करीता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे अधिकृत सोशल मीडिया पेज (फेसबुक, यु ट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्राम) ‘द मुंबई झू’ या नावाने सुरू करण्यात आले असून या सोशल मीडिया पेजचे लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते   मंगळवारी प्राणिसंग्रहालयाच्या थ्रीडी प्रेक्षागृहामध्ये पार पडले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात महापौर बोलत होत्या.
          या कार्यक्रमास ए, बी आणि ई प्रभाग समिती अध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक श्री.रमाकांत रहाटे, नगरसेवक दत्ता पोंगडे, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ.संजय त्रिपाठी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते प्रथम संगणकाची कळ दाबून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे अधिकृत सोशल मीडिया पेज ‘द मुंबई झू’ चे अनावरण करण्यात आले.

Leave a comment

0.0/5