Skip to content Skip to footer

मग कोरोना संसर्ग बाधित रुग्णांच्या संपर्कात या, मंत्री हसन मुश्रीफ यांचे विरोधकांना खुले आवाहन

राज्यात मागच्या काही दिवसांपासून अनेक मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. काहीच दिवसांपूर्वी मंत्री राजेश टोपे, मंत्री अनिल देशमुख, मंत्री राजेंद्र भरणे, मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. यावरून विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नसल्यामुळे कोरोनाचे नाटक करून अर्थसंकल्पीय अधिवेशनातून पळ काढण्यासाठी बाऊ केला जात आहे अशी टीका विरोधकांनी केली होती.

आता विरोधकांनी केलेल्या या टीकेला मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. अधिवेशन आलं की कोरोना होतो. हा विरोधी पक्षाचा आरोप चुकीचा आहे. जर एवढंच विरोधकांना वाटतं असेल तर त्यांनी कोरोना संसर्ग बाधित मंत्र्यांच्या संपर्कात यावे, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूर येथे पत्रकार माध्यमांशी बोलत होते.

तसेच यावेळी राठोड प्रकरण संदर्भात विचारले असता मुश्रीफ म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस या प्रकरणी सखोल चौकशी करणार असल्याच आधीच जाहीर केले आहे. कोणत्याही चौकशी शिवाय कारवाई करणं चुकीचं होईल असं त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5