Skip to content Skip to footer

शिवाजी महाराजांच्या मराठी अभिजात भाषेचा दर्जा नाकारणारे दिल्लीवाल्यांनो तुम्ही कोण ? -मुख्यमंत्री

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम कोणी करायचे, काय करायचे याचे उत्तर शोधण्याची गरज नाही, हे काम आपणच करायचे आहे. त्यात केवळ ‘हॅप्पी मराठी भाषा डे’ असे संदेश उद्या नाही आले म्हणजे मिळवले, असा सणसणीत टोलाही मुख्यमंत्र्यांनी मराठीची मोडतोड करणाऱ्या विरोधकांना लगावला आहे.

यावेळी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी लिहीलेल्या सरकारच डोकं ठिकाणावर आहे का? याची दाखल तत्कालीन इंग्रज राजवटीला घ्यावी लागली होती. यावेळी मराठी भाषेला गौरवशाली संस्कृती आहे याची आठवण सुद्धा मुख्यमंत्र्यांनी करून दिली होती.

तसेच शासकीय व्यवहारात सोपे शब्द वापरण्याची त्याचबरोबर सोप्या भाषेतील शब्द कोश तयार करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्वातंत्रवीर सावरकर यांनी ‘मेयर’ या शब्दाला ‘महापौर’ हा प्रतिशब्द दिला असल्याची आठवण यावेळी मुख्यमंत्र्यांनी करून दिली होती

Leave a comment

0.0/5