Skip to content Skip to footer

जर ताईंनी भाजपात प्रवेश केला नसता तर, सचिन सावंत यांचा चित्रा वाघ यांना टोला

राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापू लागले आहे. त्या विरोधकांनी आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. या प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी राठोड यांचा राजीनामा मागितला होता. त्यात बेहिशेबी मालमत्ता जमावल्या प्रकरणी चित्रा वाघ यांच्या पती विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. यावरून अक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांनी आघाडी सरकारवर बेछुड आरोप केले होते.

चित्रा वाघ यांच्या या आरोपांना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उत्तर देत त्यांना टोला लगावला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की किशोर वाघांवर आज नाही तर १५ दिवस अगोदर १२ फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला आहे. खुली चौकशी २०१६ ला भाजपाने सुरू केली. ताईंनी भाजपात प्रवेश केला नसता तर फडणवीस सरकारने तेव्हाच गुन्हा दाखल केला असता. भाजपा सरकारच्या राजकीय दिरंगाई व करोनामुळे वेळ लागला. बेहिशेबी मालमत्ता दिसली आहे. असे ट्विट त्यांनी केले आहे.

किशोर वाघ हे परळच्या महात्मा गांधी रुग्णालयात मेडिकल रेकॉर्डर म्हणून सेवेत होते. १९९७ मध्ये तक्रारदार व्यक्तीच्या भावाचा स्पाइनल कॉडच्या शस्त्रक्रियेदरम्यान गांधी रुग्णालयात मृत्यू झाला होता. यावेळी वैद्यकीय नोंदी ठेवणारे किशोर वाघ यांनी १५ लाखांची नुकसान भरपाई मिळावी आणि तक्रारदाराच्या भावाच्या मुलाला नोकरी मिळावी म्हणून अर्ज करण्याची सूचना तक्रारादारास केली होती. त्यासाठी किशोर वाघ यांनी चार लाखांची लाचही मागितली होती असा आरोप तक्रारदाराने केला होता.

Leave a comment

0.0/5