Skip to content Skip to footer

मातोश्री बाहेर झळकले पोस्टर “साहेब आपण करून दाखवलंत”

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी सेना-भाजपा पक्षात शाब्दिक युद्ध चालू झालेले आहे. लोकसभा निवडणुकीला भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या युतीच्या फॉर्मुल्याची आठवण करून देताना खासदार संजय राऊत यांनी अक्षरशः भाजपा नेत्यांना खडेबोल सुनावले आहे.

यातच सोमवारी दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्यांनी ठाण मांडल्याने राज्यातील राजकारणात वेगळी समीकरणे जुळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सोमवारी रात्रीच मातोश्रीबाहेर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन करणारे पोस्टर लावण्यात आले. परंतु या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलेले आहे.

 

साहेब आपण करून दाखवलंत’ असं लिहलेल्या या पोस्टरवर आदित्य ठाकरे यांना ‘माझा आमदार, माझा मुख्यमंत्री’ असे संबोधले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात चर्चेला उधाण आले आहे. शिवेसेनेनं ५०-५० फॉर्म्युल्यावर ठाम भूमिका घेतली असली तरी भाजप मात्र यासाठी तयार नाही. यामुळे युतीचे सरकार येईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मागण्यासाठी होती असे सांगितले जात आहे. मात्र या भेटीत राज्यातल्या राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे.

Leave a comment

0.0/5