Skip to content Skip to footer

बोराळकरांच्या उमेदवारीमुळे भाजपात धुसपूस

बोराळकरांच्या उमेदवारीमुळे भाजपात धुसपूस

भारतीय जनता पक्षाने आगामी पदवीधर निवडणुकीसाठी मराठवाडा विभागातून शिरीष बोराळकर यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यांच्यासोबत भाजपचेच इच्छुक उमेदवार प्रवीण घुगे यांचे देखील नाव चर्चेत होते. परंतु ऐनवेळी तयारी करूनही घुगे यांना नाराजीला सामोरे जावे लागले आहे. तसेच शिरीष बोराळकर यांना देखील असंख्य कार्यकर्त्यांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे. यापूर्वी बोराळकर यांना दोनदा उमेदवारी देऊनही पदवीधर मतदारसंघात यांना यश आले नव्हते. त्यामुळे यावेळी इतर इच्छुकांना उमेदवारी मिळावी अशी पक्षात चर्चा होती.

प्रवीण घुगे हे पंकजा मुंडेंच्या समर्थक गटातले असल्याचे सांगितले जात आहे. तर शिरीष बोराळकर हे फडणवीस यांच्या गटातले असल्याचे सांगितले जाते. केवळ त्यामुळेच बोराळकरांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्याचे आता नाराज कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. बोराळकर यांच्या उमेदवारीमुळे आता भाजपात मोठी धुसपूस पाहायला मिळत आहे. बोराळकरांवर बहुचर्चित कॉन्डोम घोटाळ्याचा असलेला डाग पुन्हा चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न देखील केला जात असून, बोराळकर केवळ फडणवीसांचे निकटवर्तीय असल्याने दावेदार झाले असल्याचे बोलले जात आहे.

त्यातच बोराळकर यांना यापूर्वी देखील उमेदवारी देऊन यश न आल्याने घुगे यांना संधी मिळायला हवी होती, असे सांगितले जात आहे. तसेच आगामी निवडणुकीत भाजपाला लागलेली ही उमेदवारीची झळ बोराळकर यांना पराभवाकडे घेऊन जाते की, या प्रकरणात मध्यस्थी करून वरिष्ठ बोराळकरांना होणारे नुकसान टाळतात याकडे आता लक्ष लागून आहे.

Leave a comment

0.0/5