Skip to content Skip to footer

वाढत्या महागाई विरोधात पुण्यात राष्ट्रवादीचा जनआक्रोश मोर्चा

पुणे: वाढत्या महागाईला रोखण्यात राज्यसरकार आणि केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमतीमुळे जनसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज पुणे येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अभिनव कॉलेजपासून शनिवारवाड्यापर्यंत निघालेल्या या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पवार म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले असून मूठभर व्यक्तीसाठी हे सरकार काम करत आहे. त्यांना देशातील सर्वसामान्य किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे या सरकारला उद्योगपतीचे सरकार म्हणावे लागेल, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ज्याप्रकारे पुण्यात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले तसेच राज्यभरात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

https://maharashtrabulletin.com/bacchu-kadu-on-devendra-fadnavis/

बुद्धिजीवी आणि विचारवंताच्या मारेकऱ्यांना पकडणार कधी, सर्वसामान्य नागरिकांना दोन वेळचं जेवण मिळणार का? महिला सुरक्षित होणार का? या स्वरूपाचे फलक घेऊन कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते. हे फलक रस्त्यावरील नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

अधिक माहिती

Leave a comment

0.0/5