नवी दिल्ली : आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. आयफोन 7 च्या तुलनेत या फोनला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. त्यातच आता ग्राहकांची निराशा करणारी माहिती समोर आली आहे.
चार्जिंग करताना आयफोन 8 प्लस फुटल्याचं वृत्त समोर आलं आहे. या प्रकारच्या घटना दोन ठिकाणी घडल्या आहेत. पहिलं प्रकरण तैवान, तर दुसरं जपानमधील आहे. हे दोन्ही फोन आपोआप उघडले गेले, असं बोललं जात आहे. ग्राहकांनी या फोनचे फोटोही शेअर केले आहेत.
तैवानमधील ग्राहकाने आयफोन 8 प्लस पाच दिवस वापरला आणि चार्जिंग करताना अचानक फुटला. मात्र फोनची बॅटरी फुगल्याने हा फोन फुटला किंवा काही तांत्रिक कारणांमुळे, हे अद्याप समोर आलेलं नाही.
https://twitter.com/Magokoro0511/status/911893917192163328
आयफोन 8 प्लस बॉक्समध्येच फुटलेल्या अवस्थेत होता, असा दावा जपानमधील ग्राहकाने केला आहे. या फोनचा फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान अॅपलने आयफोन 8 प्लस फुटण्याच्या या कथित घटनेनंतर चौकशी सुरु केली आहे.
https://maharashtrabulletin.com/iphone-8-8-plus-x/