Skip to content Skip to footer

तुम्ही जर ७ वर्षांपूर्वी रुपये ४५०० चे BitCoins घेतले असते तर आज तुम्ही ४९० करोड रुपयांचे मालक असता!!!

BitCoins हे एक प्रकारचे डिजिटल चलन असून याचा उपयोग तुम्ही अनेक प्रकारे करू शकता जसे की online आणि offline वस्तू किंवा सेवा खरेदी करणे. गुन्हेगार आणि हॅकर्स सती हे चलन म्हणजे एक प्रकारची लूट करण्याची सोयच आहे. गुन्हेगार आणि हॅकर्स चे सर्वात आवडते चलन असे सुद्धा आपण याला म्हणू शकतो. हे चलन deep and the dark वेब मध्ये सर्रास वापरले जाते आणि या चलनाचा उपयोग करून आपण बेकायदेशीर वस्तू त्रास सहन न करता खरेदी करू शकतो.

अलीकडेच, १२ देशांमध्ये WannaCry ransomware पसरवून हॅकर्स ने बिटकॉईनेच व्यवहार केले होते. त्यामुळे हजारो व्यवसाय प्रभावीत झाले होते. याला पडलेले बळी या हॅकर्सना bitcoin मध्ये रक्कम देऊन आपले प्रभावित झालेले कॉम्पुटर पुन्हा चालू करून घेत होते.

https://maharashtrabulletin.com/las-vegas-shooting-music-festival/

Bitcoin ही अलीकडील सर्वात जास्त नफा कमविण्यासाठी गुंतवणूक बनलेली आहे. या १ Bitcoin ची किंमत कमी कालावधीत १९ पैसे वरून १.६ लाख रुपये इतकी वाढलेली आहे. सात वर्षांपूर्वी, Laszlo Hanyecz नावाच्या प्रोग्रामर ने ‘पपा जॉन्स चे २ पिझ्झा १०,००० बिटकॉईन्स देऊन खरेदी केला होता, आज तो दिवस “Bitcoin Pizza Day” म्हणून साजरा करतात. त्या वेळी त्या प्रत्येक बिटकॉइन ची किंमत ही $०.००३ इतकी होती. $०.००३ चे असे १०,००० बिटकॉइन मिळून त्यावेळचे $३० जरी असतील तरी आज तेच bitcoins $२२.५ millions होतात. त्यावेळी (सन २०१०) जर तुम्ही रुपये ४,५०० किमतीचे बिटकॉईन्स घेतले असते तर आज तुम्ही ४९० करोड रुपयांचे मालक असता.

ही बिटकॉईन्स ला अचानक मिळालेली पसंती काही कारणांमुळे आहे. जसे की जपान मध्ये bitcoins तेथील सरकारने वैध केले आहेत, त्यामुळे तेथील दुकानदार Bitcoin वापरून खरेदी विक्री करू शकतात. अशा प्रकारेच बिटकॉईन्स ला आज खूप वाढती मागणी आहे.

Leave a comment

0.0/5