Skip to content Skip to footer

प्रसिद्ध बिकीनी क्लाइंबर चा थंडीने गारठून झाला मृत्यू

तायपेई – डोंगर सर करण्याचा प्रयत्न करत असताना तैवानची बिकीनी क्लाइंबर म्हणून प्रसिद्ध असलेली गिगी वू हिचा मृत्यू झाला आहे. बिकीनी घालून डोंगर सर करतानाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करून जगभरात तिने प्रसिद्धी मिळवली होती. ती अशाच एका मोहिमेसाठी बिकीनीवरच निघाली होती. परंतु, तिचा खराब हवामानामुळे थंडीने गारठल्याने मृत्यू झाला. तर काहींच्या मते, ती पडली होती आणि जखमी झाली होती. यानंतर तिचा मृत्यू झाला. एवढ्या थंडीत फक्त बिकीनीवर डोंगर चढण्याचा प्रयत्न करत असताना तिला हायपोथर्मिया झाला. तिचा मृतदेह बचाव पथकाला आणण्यासाठी सुद्धा पायी जावे लागले.

तिने फेसबूकवर आपल्या नावाने एक पेज तयार केला होता. तसेच लोकांना ती क्लाइंबिंग हायकिंग आणि काही साहसी करण्यासाठी प्रोत्साहित करायची. गिगी एकटीच तैवानच्या युशान राष्ट्रीय अभयारण्यातील पर्वतरांगांवर एकटी ट्रेकिंगवर निघाली होती. ती एक अनुभवी क्लाइंबर होती. हायकिंगवर जात असताना तिने आपल्यासोबत सर्वच आवश्यक साहित्य घेतले होते. परंतु, बिकीनीने तिचा जीव घेतला. आधीच थंड हवामान आणि त्यात उंच ठिकाणी जात असताना तिने अंगभर कपडे सुद्धा घातले नव्हते. तिला अशात थंडीने हायपोथर्मिया झाला आणि याच कारणास्तव तिचा जीव गेला. तिचा मृतदेह आणण्यासाठी बचाव पथक सुद्धा पायी निघाले. कारण, त्या ठिकाणी हेलिकॉप्टर नेणे सुद्धा धोक्याचे आहे. अखेर सोमवारी तिचा मृतदेह सापडला. तिच्या मृतदेहाभोवती अक्षरशः बर्फ साचले होते.

आपल्या फेसबूक पेजवर तिने शेवटची पोस्ट 18 जानेवारीला केली होती. तिच्या डोक्यावर आणि डोंगरावर त्यामध्ये ढग दिसत होते. तिने मृत्यूच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी आपल्या मैत्रिणी आणि बचाव पथकाला फोन लावला होता. तसेच आपल्याला एक पाऊल सुद्धा चालता येत नाही असे सांगितले होते. फेसबूकवर तिच्या पेजचे 18 हजार फॉलोअर आहेत. तिच्या शेवटच्या पोस्टला हजारो कॉमेंट आल्या आहेत. सगळेच तिला श्रद्धांजली वाहत आहेत.

Leave a comment

0.0/5