Skip to content Skip to footer

आता रोबोटही लावणार पुणेकरांच्या वाहतुकीला शिस्त, पोलीस घेणार चाचणी

पुणेबेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांकडून शक्कल लढवली जाते. आता थेट रस्त्यात रोबोट उतरणार असून, पादचार्‍याना रस्ता ओलांडता यावा यासाठी तो मदत तर करणार आहेच, पण त्याचसोबत वाहनचालकांना नियमांचे पालन करण्यास भाग पाडणार आहे.

पुण्यातील एसपी रोबोटिक्स मेकर लॅबच्या विद्यार्थ्यांनी हा रोबोट विकसित केला आहे. तो साधारणत: तीन फूट ऊंच असून, सिग्नल लागल्यानंतर वाहनांना थांबण्याचा इशारा करणे, पादचार्‍यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करणे, झेब्रा कॉसिंग पाळण्यास सांगणे असे विविध प्रकारे तो वाहतूक नियमानासाठी मदत करणार आहे.

या विद्यार्थ्यांनी हैदराबाद येथे या रोबोटचे यशस्वीपणे प्रात्यक्षीत केले आहे. तेथे उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता पुण्यात वाहतूक पोलीस या रोबोटची चाचणी घेतील, त्यांना हा रोबोट वापरणे व्यवहार्य वाटले तर पुण्यात त्याचा वापर केला जाणार आहे.

वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते म्हणाल्या, हा रोबोट विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. हैदराबाद येथे त्याचा डेमो दाखविण्यात आला आहे. पुण्यातही चाचणी घेतली जाईल, त्यानंतर वाहतूक नियमानासाठी वापरायचा की नाही यावर निर्णय घेतला जाईल.

Leave a comment

0.0/5