एसटी महामंडळाची भरती करताना यापुढे गाव भलतीकडे आणि नोकरी भलतीकडे असे होणार नाही. यापुढे उमेदवारांकडून दुसरीकडे आपण बदली मागणार नाही असे लिहून घेण्यात येणार असून ज्या जिह्यात भरती त्याच जिह्यात काम करायला मिळणार असल्याचे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले.
एसटीच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त ताडदेव येथे आयोजित एका भव्य सोहळय़ात ते बोलत होते. तसेच एसटीच्या महाव्यवस्थापक ते आगार व्यवस्थापकांना पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे मूळ वेतनात २.६५ पट वाढही यावेळी जाहीर करण्यात आली. तसेच एसटीच्या स्मार्टकार्ड योजनेचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला.
एसटी महामंडळाचा ७१ वा वर्धापन दिन सोहळा ताडदेव येथील गोकुळदास तेजपाल सभागृहात शनिवारी साजरा करण्यात आला. याप्रसंगी परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशीष कुमार सिंह, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल आदी मान्यवर उपस्थित होते.
1 Comment
manoj gajanan patekar
mala kaamachi graj ahe mala vattate mala hi sandi milel