भोपाळ | मध्य प्रदेशच्या भोपाळमधील 25 वर्षीय तरुण ‘पब्जी’ खेळण्यात इतका मग्न होता की, तो पाण्याऐवजी अॅसिड प्यायला. या घटनेनंतर तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने त्याचा जीव वाचला.
अॅसिड पिल्याने तरुणाचा घसा जळाला आहे. त्याच्या पोटात अल्सर झालं आहे आणि आतडे जळाले आहेत. मात्र आता त्याची तब्येत ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
विशेष बाब म्हणजे हा तरुण उपचारादरम्यानसुद्धा ‘पब्जी’ होता, असं डाॅक्टरांनी सांगितलं आहे.
दरम्यान, तामिळनाडूनंतर ‘पब्जी’ गेमवर आता मध्य प्रदेशमध्येही बॅन करण्याची मागणी होत आहे.